चौफेर न्यूज – एका विशिष्ट वयानंतर मुलांची उंची वाढणे बंद होते. यासाठीच त्यांचे योग्य वय आहे तोवर त्यांना चांगली फळे, भाज्या आणि आहार खाऊ घालावा जेणेकरून मुलांची उंची योग्य वाढेल. एका संशोधनाच्या अनुसार, मुलांच्या शरीराची उंची हि त्यांच्या खाण्या-पिण्यावर अवलंबून असते. आपली मुलं निरोगी असावीत, त्यांचं आयुष्य सुदृढ राहाव असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं. पण त्यासाठी मुलांना चांगला आहार आणि पौष्टिक पदार्थ खाऊ घालणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जर त्यांचा आहार योग्य आणि पौष्टिक नसेल तर केवळ त्यांना विविध आजारच होत नाहीत तर त्यांची वाढ देखील खुंटते
फळे आणि ज्यूस – फळांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रोटीन, जीवनसत्त्व ‘क’ सह विविध प्रकारचे पोषक तत्व आढळतात. रोज फळे आणि ज्यूस मुलांना आहारात दिल्याने मुलांच्या उंची मध्ये वृद्धी होते. तुम्ही आजही मुलांच्या आहारात फळे आणि ज्यूस यांचा समावेश केला नसेल तर आवर्जून त्याचा मुलांच्या आहारात समावेश सुरु करा आणि त्यांना सुदृढ बनवण्यापासून त्यांची शारिरीक उंची वाढवण्यात मदत करा.
दूध – दुधात योग्य प्रमाणात कॅल्शियम आढळते जे मुलांच्या हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असते आणि शारीरिक विकासातही महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. लहानपणापासूनच योग्य प्रमाणात जर बाळाच्या आहारात दुधाचा समावेश केला गेला तर त्यांची उंची वाढत राहते आणि बोन मास तसेच बोन डेन्सीटीचा सुद्धा योग्य विकास होतो.
मांस – मांसात सर्वाधिक प्रमाणात प्रथिन अर्थात प्रोटीन आढळते. यामुळे विविध आजारांपासून देखील मुलांचा बचाव होतो. एवढचं नाही तर मांस खाल्ल्याने शारीरिक उंचीच्या विकासाला देखील चालना मिळते.
अंडी – अंडयात अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रथिनांची मात्रा असते. प्रथिने हे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही विकासात योगदान देते. एका संशोधनाच्या अनुसार ६ महिने दररोज २ अंडी खाल्ली तर मुलांची उंची योग्य प्रमाणात तर वाढते आणि शरीराला अतिशय चांगली पोषकता मिळते आणि शरीर सुदृढ होते.
पालेभाज्या – तुमच्या मुलाला जर चांगली शारीरिक उंची मिळावी असे वाटत असेल तर आवर्जून त्याला पालेभाज्या खाऊ घाला. जर मुलं पालेभाज्या खाण्यास कंटाळा करत असेल तर त्यांच्या आवडत्या डिशेस बनवून त्यातून त्यांना पालेभाज्या खाऊ घालाव्यात.