चौफेर न्यूज – दि. 29-12-2022 रोजी प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे क्रिडा स्पर्धा साजरी करण्यात आली.
खेल है ।
हारने का गम मत करो,
फिर खेलो,
पर हौसला कम मत करो |
आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री हिरामण चौरे सर हे उपस्थित होते. तसेच शाळेचे समन्वयक श्री. राहुल पाटिल सर व मुख्याध्यापिका अनिता पाटिल मॅम उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी सुंदर असे फलक लेखन करण्यात आले व सुरेख अशी रांगोळी रेखाटण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अश्विनी सुर्यवंशी व हेतल राजपूत मॅम यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने केली. व तसेच श्री. चौरे सर यांनी दैनंदिन जीवनात खेळांचे काय महत्व आहे याविषयी मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी असे सांगितले की शारीरिक शिक्षण पद्धतीचा अविभाज्य भाग आहे. जीवनाचे आरोग्य आणि चैतन्य मिळवण्यासाठी खेळ देखील खेळले पाहिजे.
इयत्ता 4 थी च्या विद्यार्थ्यांनी मार्च पास्टची सलामी दिली. क्रिडा स्पर्धेच्या समारंभाला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रिडा मशाल प्रज्वलित करण्यात आली. तसेच इयत्ता 5 वी च्या विद्यार्थ्यांनी विविध पिरॅमीडचे प्रदर्शन केले.
Running या खेळाचे उद्धाटन प्रमुख अतिथी यांच्या हस्ते केले व क्रिडा स्पर्धेला सुरुवात झाली. खेळाची सुरुवात हिरवा झेंडा फडकवून करण्यात आली.
विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्रिडा प्रकार घेण्यात आले. जसे Running, Potato Race, Bottle Feeling, Book Balancing, Throw Balls in bucket, Run with Balloons game, Ball Balance, Glass Pyramid, Touch the Cone, Bottle Shooting, Langadi, Skipping, Three Leg Race, Blow the balloon, Badminton etc.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने केली. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.