पिंपरी, दि.४ जानेवारी २०१७ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. ५७ पिंपळे गुरव
येथील आरक्षण क्र. ३५० येथे पी.एम.पी.एम.एल करिता बस टर्मिनल विकसित करणे व पिंपळे गुरव
येथे स्मशानभूमी नुतणीकरण या कामांचे भूमिपूजन शनिवार, दि.३१ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी ११
वाजता आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाले.
महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्य राजेंद्र
जगताप, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र राजापुरे, सह शहर अभियंता राजन पाटिल, सहाय्यक
आयुक्त चंद्रकांत खोसे, माजी नगरसदस्य राजू लोखंडे, , कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, प्रमोद
ओंभासे, बापु गायकवाड, उपअभियंता शिरीष पोरेड्डी, कार्यालय अधिक्षक विजय सोनवणे, मुख्य
आरोग्य निरीक्षक एस.एस.गायकवाड तसेच माजी सैनिक संघाचे जेष्ठ प्रतिनिधी यांच्यासह सर्व
सन्माननीय पदाधिकारी, नगरसदस्य, नगरसदस्या आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले यांनी केले.