पिंपरी, दि. ०७ जानेवारी २०१७ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २२ चिंचवडगाव मधील रस्त्यांचे नामकरण व नामफलकाचे उद्घाटन तसेच प्रकल्पांचे भूमिपूजन नगरसदस्य संदिप चिंचवडे व नगरसदस्या अश्विनी गजानन चिंचवडे पाटील यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास माजी शिक्षणमंडळ सदस्य गजानन चिंचवडे, कार्यकारी अभियंता एकनाथ पाटिल, चंद्रशेखर धानोरकर, प्रशासन अधिकारी रवि जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर आपटे, आप्पा कुलकर्णी, संतोष सौदंनकर, बाळासाहेब पडवळ, अशोक तलाठी, खंडुशेठ चिंचवडे, धोडिंबा सायकर, प्रशिक्षक माधुरी कुलकर्णी, स्नेहल सातभाई, संतोष साळवे, समीर सुर्यवंशी, माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले, किशोर केदारी, प्रविण बागलाणे, आकाश चव्हाण, ज्ञानेश्वर भरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चिंचवड मधील पार्किंग आराखड्याचे भूमिपूजन, पंडित पद्माकर कुलकर्णी संगीत वर्गाचे उद्घाटन, दत्तमंदिर गोखले पार्कचे भूमिपूजन, साई साठे पार्कच्या नामफलकाचे उद्घाटन, संत तुकाराम महाराज व्यासपीठाचे उद्घाटन, कै. वसंतराव जोशी मार्गच्या नामफलकाचे उद्घाटन, सदगुरू श्री. वामनराव पै. बॅडमिटन हॉलच्या फलकाचे नामकरण, चिंचवड देऊळमळा प्रवेशद्वाराचे उद्घाटन, पु.ल.कट्टा कामाचा शुभारंभ, संतश्री. गजानन महाराज व्यासपीठाचे उद्घाटन, बळवंत राघुजी चिंचवडे – महिला व्यायामशाळेचे उद्घाटन आदी कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमांचे सुञसंचालन रमेश भोसले यांनी केले.