– आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती
– विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी
पिंपरी- ‘उद्योगनगरी’ पिंपरी-चिंचवडच्या उभारणीत जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर आणि पारनेर तालुक्यातील नागरिकांचे मोलाचे योगदान आहे. तसेच, या भागातून भोसरी आणि परिसरात नोकरी-व्यावसायाच्या निमित्ताने स्थायिक झालेल्या लोकांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे या शिवजन्मभूमिवासीयांचा स्नेहमेळावा आयोजित केला आहे.
भोसरी येथील इंद्रायणी मंगल कार्यालयामध्ये गुरुवार दिनांक १९ जानेवारी २०१७ रोजी हा स्नेहमेळावा होणार आहे. यावेळी भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, मुंबई येथील व्याख्याते प्रथमेश कर्णिक हे ‘सध्याचे राजकारण आणि मतदात्यांचा अधिकार’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी हळदी-कुंकू समारंभ, महाआरोग्य आयुर्वेदिक शिबीर, लहान मुलांसाठी विविध खेळ आदी कार्यक्रम होणार आहेत.
स्वामी कृपा युवा मंच, तसेच जुन्नर, शिरुर, आंबेगाव, खेड व पारनेर तालुका मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी अमोल बांगर- 7709700999, सचिन बंगाळ-9096300013, विशाल बांगर- 9028120167 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.