भाजपाची पहिली 125 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये पुण्यातल्या कसबा मतदारसंघातून मुक्ता टिळक, कोथरुडमधून चंद्रकांत पाटील, सातार्‍यातून शिवेंद्रराजे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. नवी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा नेते अरुण सिंह यांनी ही घोषणा केली. भाजपाच्या या 125 उमेदवारांच्या पहिल्या यादीत 52 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. यामध्ये 12 महिला आमदारांचा समावेश आहे. 12 मतदारसंघांची आदलाबदल करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. पुण्यातील आठही जागा भाजपाच्या वाटेला तर मुंबईतील 19 जागा या शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. विदर्भ (38), उत्तर महाराष्ट्र (11), मुंबई-ठाणे (20), कोकण (2) , पश्‍चिम महाराष्ट्र (31) इतक्या जागांवरील उमेदवारांचा या यादीत समावेश आहे. दरम्यान, पहिल्या यादीत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.

उत्सुकता लागून राहिलेल्या काही महत्वाच्या मतदारसंघांपैकी कसबा मतदारसंघातून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेवरुन यापूर्वी नुकतेच खासदार झालेले गिरीश बापट पाच वेळा निवडून आले आहेत. त्याचबरोबर पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच अपेक्षेप्रमाणे सातार्‍यातून शिवेंद्रराजे भोसेल यांना, तर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (नागपूर दक्षिण-पश्‍चिम), अतुल भोसले (कराड दक्षिण), पंकजा मुंडे (परळी), राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), गिरीश महाजन (जामनेर), संदीप नाईक (ऐरोली), सुनील कांबळे (पुणे कॅन्टोन्मेट), हर्षवर्धन पाटील (इंदापूर), जयकुमार रावल (सिंदखेडा), राजकुमार बडोले (अर्जुनी मोरगाव), मंदा म्हात्रे (बेलापूर) आदींचा पहिल्या यादीत समावेश आहे.

उमेदवाराचे विधानसभा नाव –

1. नागपूर दक्षिण पश्‍चिम – देवेंद्र फडणवीस
2. 210 कोथरूड – चंद्रकांतदादा पाटील
2. शहादा (एसटी) – राजेश उदेसिंग पाडवी
3. छरपव नंदुरबार (एसटी) –  डॉ.विजयकुमार गावित
4. नवापूर (एसटी) – भारत माणिकराव गावित
6. धुळे ग्रामीण  – श्रीमती. ज्ञानज्योती मनोहर बदाणे पाटील
7. 8 सिंदखेडा – जयकुमार रावल
8. 11 रावेर – हरिभाऊ जावळे
9. 12 भुसावळ (एससी) – संजय सावकारे
10. 13 जळगाव शहर – सुरेश (राजुमामा) भोळे
11. 15 अमळनेर – शिरीष चौधरी
12. 17 चाळीसगाव – मंगेश रमेश चव्हाण
13. 19 जामनेर – गिरीश महाजन
14. 21 मलकापूर – चैनसुख संचेती
15. 23 चिखली – श्रीमती. श्‍वेता महाले
16. 26 खामगाव – आकाश फुंडकर
17. 27 जळगाव (जामोद) –  डॉ. संजय कुटे
18. 28 अकोट – प्रकाश भारसाकले
19. 30 अकोला पश्‍चिम – गोवरधन शर्मा
20. 31 अकोला पूर्व – रणधीर सावरकर
21. 32 मूर्तिजापूर (एससी) – हरीश पिंपळे
22. 34 वाशिम (एससी) – लखन मलिक
23. 35 कारंजा – डॉ राजेंद्र पाटणी
24. 38 अमरावती – डॉ. सुनील देशमुख
25. 40 दर्यापूर (एससी) – रमेश बुंडिले
26. 43 मोर्शी – डॉ अनिल बोंडे
27. 44 आर्वी – दादाराव केचे
28. 46 हिंगणघाट – समीर कुणावर
29. 47 वर्धा – डॉ. पंकज भोयर
30. 49 सावनेर – डॉ. राजीव पोतदार
31. 50 हिंगणा – समीर मेघे
32. 51 उमरेड (एससी) – सुधीर परवे
33. 53 नागपूर दक्षिण – मोहन मते
34. 54 नागपूर पूर्व – कृष्णा खोपडे
35. 55 नागपूर मध्य – विकास शंकरराव कुंभारे
36. 56 नागपूर पश्‍चिम – सुधाकर देशमुख
37. 57 नागपूर उत्तर (एससी) डॉ. मिलिंद माने
38. 63 अर्जुनी-मोरगाव (एससी) – राजकुमार बडोले
39. 64 तिरोरा श्री विजय रहांगडाले
40. 66 आमगाव (एसटी) – संजय पुरम
41. 67 आरमोरी (एसटी) – कृष्ण डी. गजभे
42. 68 गडचिरोली (एसटी) डॉ. रावराव होळी
43. 70 राजुरा श्री संजय धोटे
44. 71 चंद्रपूर (एससी) – नाना श्यामकुले.
45. 72 बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
46. 74 चिमूर – कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया
47. 76 वणी – संजीव रेड्डी बोडकुरवार
48. 77 राळेगाव -अशोक रामजी उईके
49. 78 यवतमाळ – मदन मधुकर येरवार
50. 80 आर्णी (एसटी) डॉ. संदीप प्रभाकर धुर्वे
51. 85 भोकर – बापूसाहेब गोरठेकर
52. 91 मुखेड – डॉ.तुषार राठोड
53. 94 हिंगोली – तानाजी मुटकुले
54. 99 परतूर – बबनराव दत्तात्रय लोणीकर
55. 102 बदनापूर (एससी) – नारायण कुचे
56. 103 भोकरदन – संतोष रावसाहेब पाटील दानवे
57. 106 फुलंब्री – हरिभाऊ बागडे
58. 109 औरंगाबाद पूर्व – अतुल सवे
59. 111 गंगापूर – प्रशांत बाम
60. 118 चांदवड डॉ. राहुल आहेर
61. 124 नाशिक सेंट्रल – देवयानी फरांदे
62. 125 नाशिक पश्‍चिम – सीमा हिरे
63. 128 डहाणू (एसटी) – पासकल धनारे
64. 129 विक्रमगड (एसटी) डॉ. हेमंत सवारा
65. 136 भिवंडी पश्‍चिम – महेश चौगुले
66. 139 मुरबाड – किसन कथोरे
67. 142 कल्याण पूर्व – गणपत कालू गायकवाड
68. 143 डोंबिवली – रविंद्र चव्हाण
69. 145 मीरा भाईंदर – नरेंद्र मेहता
70. 148 ठाणे -संजय केळकर
71. 150 ऐरोली – संदिप नाईक
72. 151 बेलापूर – श्रीमती. मंदा म्हात्रे
73. 153 दहिसर – श्रीमती. मनीषा चौधरी
74. 155 मुलुंड – मिहिर कोटेचा
75. 160 कांदिवली पूर्व – अतुल भटखळकर
76. 161 चारकोप – योगेश सागर
77. 163 गोरेगाव – श्रीमती. विद्या ठाकूर
78. 165 अंधेरी वेस्ट – अमित साटम
79. 167 विलेपार्ले – अ‍ॅड. पराग अलावानी
80. 169 घाटकोपर पश्‍चिम – राम कदम
81. 177 वंद्रे वेस्ट – अ‍ॅड. आशिष शेलार
82. 179 सायन कोळीवाडा – कॅप्टन तामिळ सेलवान
83. 180 वडाळा – कालिदास कोळंबकर
84. 185 मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
85. 188 पनवेल – प्रशांत ठाकूर
86. 191 पेन – रविशेठ पाटील
87. 198 शिरूर – बाबुराव काशिनाथ पाचर्णे
88. 200 इंदापूर – हर्षवर्धन पाटील
89. 205 चिंचवड श्री लक्ष्मण जगताप
90. 207 भोसरी – महेश (दादा) किसान लांडगे
91. 208 वडगाओल शेरी – जगदीश मुलिक
92. 209 शिवाजीनगर – सिद्धार्थ पद्माकर शिरोळे
93. 211 खडकवासला – भीमराव तापकीर…
94. 212 पर्वती – श्रीमती. माधुरी मिसाळ
95. 213 हडपसर – योगेश टिळेकर
96. 214 पुणे कॅन्टोन्मेंट (एससी) – सुनील कांबळे
97. 215 कसबा पेठ – मुक्ता टिळक
98. 216 अकोले (एसटी) – वैभव पिचड
99. 218 शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
100. 219 कोपरगाव श्रीमती. स्नेहलता कोल्हे
101. 221 नेवासा – बाळासाहेब मुरकुटे
102. 222 शेवगाव – श्रीमती. मोनिका राजळे
103. 223 राहुरी- शिवाजीराव कर्डिले
104. 226 श्रीगोंदा – बबनराव पाचपुते
105. 227 कर्जत जामखेड – प्रा.राम शिंदे
106. 228 जिओराई – अ‍ॅड. लक्ष्मण पवार
107. 229 माजलगाव – रमेश आडस्कर
108. 231 आष्टी – भीमराव धोंडे
109. 233 परळी – पंकजा गोपीनाथराव मुंडे – पालवे
110. 236 अहमदपूर – विनायक किसन जाधव पाटील
111. 238 निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर
112. 239 औसा – अभिमन्यू पवार
113. 241 तुळजापूर – राणा जगजितसिंह पा.
114. 248 सोलापूर शहर उत्तर – विजयराव देशमुख
115. 251 सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
116. 256 वाई – मदन प्रतापराव भोसले
117. 258 मनुष्य – जयकुमार गोरे
118. 260 कराड दक्षिण – अतुल सुरेश भोसले
119. 262 सातारा – शिवेंद्रसिंह अभिसिंगराजे भोसले
120. 274 कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
121. 279 इचलकरंजी – सुरेश हलवणकर
122. 281 मिरज (एससी) – सुरेश खाडे
123. 282 सांगली – सुधीर गाडगीळ
124. 284 शिराळा – शिवाजीराव नाईक
125. 288 जाट – विलासराव जगताप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here