पिंपरी चिंचवड – २०६ पिंपरी (अ.जा.)विधानसभा मतदार संघ अंतर्गत २०१९ च्या विधानसभा मतदानामध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी स्वीप कक्षाअंतर्गत मतदानाविषयी नागरीकांचे प्रबोधन करणे, मतदार जागृती करणेकरिता विविध नाविन्यपुर्ण उपक्रम राबविणेत येत आहेत. यामध्ये बुधवारी प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अन्ड कॉम्पुटर स्टडीज व प्तिभा जुनियर कॉलेज चिंचवड येथे मतदान जनजागृती करण्यात आली. विद्यार्थांना व कर्मचाऱ्यांना मतदान करणेबाबत व इतरांना मतदान करणेसाठी प्रवृत्त करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात सेक्रेटरी, डॉ. दिपक शाह, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्य डॉ. वनिता कुऱ्हाडे, कार्यक्रम अधिकरी अरविंद बोरणे, शा.शी संचालक आनंद लुकंड, पांडुरंग इंगळे होते. तसेच १०० टक्के मतदान होईल, यादृष्टिने सर्व मतदारांशी संपर्क साधून मतदानास प्रवृत्त व मतदानाचा हक्क बजवण्याबाबत प्रेरित करणेकामी सुचना स्वीप कक्ष प्रमुख सुनिल वाघमारे यांनी सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांना सुचना दिल्या. सदर कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्खेने विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच सर्वांनी जोमाने कामकाज करुन मतदानाची टक्केवारी वाढविणे करिता योगदान देणेबाबत स्वीप कक्ष प्रमुख मुकेश कोळप यांनी सुचना देऊन अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झालेली सभा संपल्याचे जाहिर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here