पिंपरी | चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार राहूल कलाटे यांना वंचित बहूजन आघाडीने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. याबाबत वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्राद्वारे कळविले आहे. चिंचवड विधानसभेचे अपक्ष उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आहे. चिंचवड विधानसभेतील अपक्ष उमेदवारांनी वंचित आघाडीने पाठिंबा द्यावा, अशी मागणी उमेदवार राहूल कलाटे यांनी केली होती. त्यानूसार वंचित बहूजन आघाडी व भारिप कार्यकर्ते व पदाधिका-यांनी नोंद घ्यावी, असेही म्हटले आहे.

दरम्यान, राहुल कलाटे हे कट्टर शिवसैनिक आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. ते पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेतेपदी आहेत. मागील वेळी म्हणजे 2014 ला शिवसेना आणि भाजपची युती नव्हती. त्यावेळेला राहुल कलाटे सेनेचे तर लक्ष्मण जगताप भाजपचे उमेदवार होते. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार असल्याने चिंचवडमध्ये चौरंगी लढत झाली होती. मात्र, मोदी लाटेत लक्ष्मण जगताप ह्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. मात्र, त्याही परिस्थितीत कलाटे ह्यांना दोन नंबरची मते मिळाले होते. त्यामुळे कलाटे हेच जगताप यांना टक्कर देऊन आव्हान निर्माण केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here