मुंबई : शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे पुन्हा एकदा शरद पवारांच्या घराकडे निघाले आहेत. ते शरद पवारांकडे का जात आहेत, याचं कारण अजून समजू शकलं नसलं तरी, भाजपा शिवसेना आणखी दूर जात असल्याचं स्पष्ट होत आहे. संजय राऊत जेव्हा शरद पवारांच्या घराकडे निघाले, तेव्हा पत्रकारांशी बोलताना त्यांनी ‘फक्त मुख्यमंत्रीपद’ असा पुन्हा पुनरूच्चार केला.

शरद पवारांकडे संजय राऊत गेले आहेत, या आधी भाजपाकडून रामदास आठवले यांनी शरद पवार यांची याविषयावर तिढा सुटावा, यासाठी पवारांची भेट घेतली. परिस्थितीवर काय मार्ग काढता येईल यावर सल्ला घेण्यासाठी आपण पवारांच्या घरी आल्याचं यावेळी रामदास आठवले यांनी सांगितलं होतं.

रामदास आठवले यांना शरद पवारांनी, महाराष्ट्राच्या जनतेने शिवसेना-भाजपच्या बाजूने कौल दिला आहे, त्यांनी सरकार स्थापन करावं, आणि दुसरीकडे राज्यपालांनी देखील सर्वात मोठ्या संख्येने आमदार असलेल्या पक्षाला आता सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करावं, असं देखील शरद पवार यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here