पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांसाठी अर्ज करण्यास २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतची माहिती नागरवस्ती विभागाचे प्रमुख उल्हास जगताप यांनी दिली.

महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षासाठी लाभ देण्याचे सर्व कल्याणकारी योजनांचे अर्ज जाहीर प्रकटनाद्वारे प्रसिद्ध देऊन मागविण्यात आले होते. हे अर्ज स्वीकृतीची अंतिम तारीख २५ सप्टेंबर २०१९ होती. तथापि, काही शैक्षणिक योजनांच्या बाबतीत महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रीया अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या योजनांसाठी मुदतवाढ देणे आवश्यक होते. त्यामुळे नागरवस्ती विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांसाठी अर्ज करण्यास २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here