पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे, सेक्टर क्र. २३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा विषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे व शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असल्यामुळे गुरुवारी (दि. १४) रोजी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा सायंकाळी बंद ठेवण्यात येणार आहे.

गुरूवार (दि. १४) रोजी महापालिकेमार्फत होणारा सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर दुरूस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागाचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. दुरूस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार (दि. १५) रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करावा, असे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सह. शहर अभियंता यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here