साक्री येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये दि.१४ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.  तत्पूर्वी, कार्यक्रमाची सुरुवात  पंडित नेहरू व सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य अतुल देव, स्कूलचे व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.  चाचा नेहरूंचा पोशाख परिधान केलेले इयत्ता ५ वीतील विद्यार्थी कार्यक्रमात आकर्षण ठरले. इयत्ता ५ वी,  ६वी, ७वी मधील विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे पंडित नेहरू यांच्या जीवनाविषयी थॊडक्यात माहिती सांगितली. शिक्षिका गितल कोठावदे, मोहन गावित यांनी बालदिन आणि पंडित नेहरू यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

शाळेचे प्राचार्य अतुल देव यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, चाचा नेहरू यांच्या जीवनातील काही प्रसंग गोष्टी रूपाने सांगितले. तसेच इ. ९ वी तील विद्यार्थिनींनी शिक्षिका स्वाती आहिरे, शर्मा सर,  सीमा मोरे यांच्या मार्गदर्शनाने नृत्य-नाटिका सादर केले. दरम्यान, विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता ५ वी साठी बॉल थ्रो, ६ वी साठी दोरी उडी,  इयत्ता ७वी ,  ८ वी, ९वी साठी क्रिकेट आणि  प्रश्नमंजुषा इत्यादी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.  कार्यक्रमाची रूपरेषा सीमा मोरे यांनी मांडले. सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक जयेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाने इ.६ वी मधील प्रेक्षा पवार, क्रिष्णा अकलाडे  यांनी केले. सुंदर फलक लेखन भूपेंद्र साळुंखे यांनी केले. छायाचित्रण नितीन राजपूत यांनी केले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिककेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here