साक्री –   प्रचिती प्री प्रायमरी स्कूल साक्री येथे  दि. 29  शुक्रवार रोजी कथाकथन स्पर्धा घेण्यात आली.  या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी होत्या. व्यवस्थापक वैभव सोनवणे यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये  लहानपणापासूनच व्यासपीठावर बोलण्याचे धाडस निर्माण व्हावे. त्यांच्यात वक्तृत्वाची आवड निर्माण व्हावी, यासाठी कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कथाकथन स्पर्धेमध्ये शाळेतील लहान-लहान चिमुकल्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. आजच्या कथाकथन स्पर्धेत नर्सरी पासून ते यूकेजी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध नवीन बोधकथा सांगून चिमुकल्यांनी उत्साह दाखवला. स्पर्धा मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये घेण्यात आली. परीक्षकांची भूमिका शाळेतील शिक्षिकांनी निभावली. स्पर्धेचे गुणांकन गोष्टीनुसार,  पोशाख,  आवाज व कृती यानुसार देण्यात आले असून वर्गानुसार क्रमांक काढण्यात आले.

 विजयी स्पर्धक खालील प्रमाणे………

नर्सरी -प्रथम : विधीत गांगुर्डे. द्वितीय क्रमांक- कृष्णा बोरसे. तृतीय क्रमांक – कनक बोरसे. उत्तेजनार्थ-कृष्णा सोनवणे.

एलकेजी डायमंड : प्रथम -आयुष माळीचकर,  द्वितीय – अनुश्री देशमुख, तृतीय – तनवी सोनवणे. उत्तेजनार्थ- परिनीती गांगुर्डे.

एलकेजी गोल्ड- प्रथम क्रमांक-पूर्वा अहिराव,  द्वितीय – सार्थक बोडके, तृतीय – अंजली खैरनार,   उत्तेजनार्थ- मितेश सोनवणे.

यूकेजी रोझ- प्रथम – निहारिका बोरसे,  द्वितीय – अर्पित भदाने,  तृतीय – ध्रुव, उत्तेजनार्थ – हार्दिक सरक आणि शिवम पगारे.

 यूकेजी लोटस- प्रथम – परीनीती खैरनार,  द्वितीय – धैर्या शेवाळे,  तृतीय –  चैतन्य देसले, उत्तेजनार्थ- पुष्पांजली भामरे आणि शौर्य देसले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here