साक्री – येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ख्रिसमस सणानिमीत्त पटांगणात धम्माल मस्ती केली. मंगळवार दि. २४ रोजी हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी, व्यासपीठावर प्राचार्य अतुल देव, प्रचिती प्री प्रायमरी स्कूलच्या प्राचार्या भारती पंजाबी, शाळेचे समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सांताक्लॉजच्या आगमनाने झाली.
सांताने आपल्या जादुई झोळीतून विविध प्रकारच्या चॉकलेट काढून विद्यार्थ्यांमध्ये वाटप केल्या. तसेच, सेलिब्रेशन केक कापून ख्रिसमस साजरा करण्यात आला. यावेळी, ख्रिसमस सणाचे महत्त्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी विषद केले.
कार्यक्रमाचे संयोजन मोहन गावित यांनी केले. सूत्रसंचालन नितु पंजाबी, छायाचित्रण नितीन राजपूत तसेच फलक लेखन भुपेंद्र साळुंखे, वैष्णवी थोरात यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.