Chaupher News
जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात सोमवारी भारतीय लष्कराचं ‘चीता’ हे हेलिकॉप्टर कोसळलं. सकाळी साधारण ११ वाजेच्या आसपास ही दुर्घटना घडली. जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील माहोर येथे ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट सुरक्षित आहेत.
उधमपूर येथून या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. ज्यानंतर ही दुर्घटना घडली. याप्रकरणी लष्कराकडून चौकशी केली जात आहे.या अगोदर सप्टेंबर २०१९ मध्ये पूर्व भूतान येथे देखील चीता हेलिकॉप्टर कोसळले होते. त्या वेळी घडलेल्या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला होता. ज्यामध्ये भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर असणाऱ्या रजनीश परमार व वैमानिक कॅप्टन कालझँग वांगडी यांचा समावेश होता.