Chaupher News
सगळ्यांच्याच नजरा दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागल्या आहेत. मात्र त्याच वेळी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील हालचालीही वाढल्या आहेत. भाजपने सोमवारी (10 फेब्रुवारी) रात्री उशिरा आपल्या राज्यसभा खासदारांना व्हिप जारी केला आहे. या व्हिपनंतर सोशल मीडियावर शंका, अंदाज, चर्चांना उधाण आलं आहे. तसंच विविध अटकळ बांधल्या जात आहेत. समान नागरी विधेयकापासून दिल्लीसंदर्भात काही मोठ्या निर्णयाबाबत चर्चा सुरु झाली आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. आजच अर्थमंत्री निर्मला सीतारमण दोन्ही सभागृहांमध्ये अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उत्तर देतील. त्यातच भाजपने राज्यसभेतील आपल्या खासदारांना व्हिप जारी केला आहे, ज्यात सर्व सदस्यांना सभागृहात उपस्थित राहून सरकारला पाठिंबा देण्यास सांगितलं आहे. यंदा अधिवेशन संपण्यापूर्वी सरकार संसेदत अर्थ विधेयक सादर करणार आहे.