पिंपळनेर : साक्री तालुक्यातील बल्हाणो येथील श्री भवानी माता डोंगरावर नवरात्रोत्सवानिमित्त यात्रोत्सव व कुस्त्यांची दंगल झाली. प्रमुख पाहुणो म्हणून महंतदास मकरंद वैद्य, डॉ.तुळशिराम गावित, माजी सभापती जितेंद्र बिरारीस, हभप भालचंद्र दुसाने, पोपट कोळी आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन जय भवानी मित्र मंडळ व ग्रामस्थांतर्फे करण्यात आले होते. नवरात्रोत्सवाप्रारंभी भवानी देवीच्या पूजेचा व ध्वज लावण्याचा मान संजय दाभाडे यांच्या परिवारास मिळाला. गडावर घटस्थापना झाल्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
हजार फूट उंच डोगरावर देवीचे मंदिर आहे. पुरातन मूर्ती असून गावाचे ग्रामदैवत आहे. डोंगराच्या पायथ्याशी यात्रा भरविली जाते. यात्रेच्या दिवशी 21 जोडप्यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा करण्यात आली. तंटामुक्ती अध्यक्ष संजय लोहार व भवानी देवी मंदिर मित्र मंडळाने
परिश्रम घेतले.