Chaupher News

पिंपरी : काेराेनाचे पाच रुग्ण पुण्यात आढळल्यानंतर त्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे पुण्यातील अनेक आयटी कंपन्यांनी ऑफिस बंद केले आहे तर काही कंपन्यांनी घरीच बसून काम करण्याच्या सूचना कामगारांना दिल्या आहेत.
काेराेनाबाधित पाच रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शाेध घेण्यात येत असून त्यांच्यापैकी काेणाला लागण झाली आहे का याची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान काेराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुण्यात तणावाचे वातावारण आहे. दुबईवरुन आलेल्या दांपत्याला काेराेनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर तीन जणांना देखील काेराेनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काेराेनाचा प्रसार राेखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून आराेग्य विभागाकडून याेग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.
दरम्यान पुण्यात काेराेनाचे रुग्ण वाढत असल्याने याचा धसका पुण्यातील आयटी कंपन्यांनी घेतल्याचे समाेर आले आहे. मगरपट्टासिटी येथील एका आयटी कंपनीमधील कर्मचाऱ्याला काेराेनाची लक्षणे आढळल्याने त्याची चाचणी करण्यात आली. त्यामुळे खबरदारी म्हणून कंपनीचा सर्व फ्लाेअर रिकामा करण्यात आला असून कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याचा पर्याय दिला आहे. तसेच आराेग्याची काळजी घेण्यासही सांगण्यात आले आहे. असाच प्रकार हिंजवडी येथील आयटी कंपनीत देखील घडला असून तेथील एक कंपनीचे ऑफिस रिकामे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here