चौफेर न्यूज – आज दिनांक 1/10/20 गुरुवारी “गांधी जयंती”साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक श्री राहुल पाटील सर प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
सरस्वती व महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन श्री राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आजच्या दिवशी श्री राहुल पाटील यांनी “सत्य व अहिंसा” या विषयी माहिती सांगून महात्मा गांधीजी यांचा जीवनपट थोडक्यात सांगितला. कार्यक्रमात शाळेचे शिक्षक व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.