चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल येथे महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमास प्राचार्या सौ.वैशाली लाडे व्यवस्थापक श्री.तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी शाळेचे सहकारी शिक्षक श्री.रावसाहेब सावळे यांनी गांधीजींच्या जीवन परिचय व त्यांच्या कार्याविषयी माहिती देताना सांगितले की, महात्मा गांधी जनसेवेची प्रत्यक्ष मूर्ती त्यागाची साकार प्रतिमा आणि देशासाठी प्राणार्पण करणारे सच्चे सैनिक असून लोकांनी त्यांना बापू तर विश्वाने त्यांना महात्मा इतिहासकारांनी त्यांना राष्ट्रपिता उपाधी दिली.असे मत व्यक्त केले.तसेच प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांनी महात्मा गांधीजींच्या सत्याचे प्रयोग या आत्मकथेतून सर्व मानवास प्रेरणा मिळते व अनेकांच्या जीवनात ही परिवर्तन घडून आले व गांधीजींच्या आदर्शावर अनेक लोक मार्गक्रमण करतात. गांधीजींच्या सत्याचे प्रयोग ही आत्मकथा गांधीजींच्या जीवनाचा आरसा आहे व गांधीजी सत्य अहिंसेचे पुजारी होते.तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याविषयी माहिती विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्मिता नेरकर यांनी केले व फलक लेखन श्री.मोहन गावित यांनी केले.या कार्यक्रमास शाळेचे सर्व शिक्षक वृंद व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.