चौफेर न्यूज – शालेयस्तरावर मराठी भाषा सक्तीच्या दृष्टीने अधिनियमांतर्गत नियमावली करण्यासाठी आठ बड्या अधिकाऱ्यांची समिती गठित केली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (विद्या प्राधिकरण) संचालक दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे कामकाज चालणार आहे.
शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले, विद्या प्राधिकरणातील प्रभारी प्राचार्य विकास गरड, मराठी भाषा विभागाचे उपविभागप्रमुख जगराम भटकर, बालभारतीचे विशेषाधिकारी राजीव पाटोळे, मंत्रालयातील मराठी भाषा विभागाचे अवर सचिव नंदा राऊत यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.
विद्या प्राधिकरणातील अभ्यासक्रम व विकसन विभागाचे उपविभागप्रमुख वर्षाराणी पाटोळे यांना सदस्य सचिव म्हणून समितीत संधी दिली आहे. याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिले.