चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मधील इयत्ता सातवीतील विद्यार्थी पूर्वेश राकेश काकुस्ते या विद्यार्थ्याने नोबेल फाउंडेशन ने आयोजित केलेली Nobel Science Talent Search Exam (NSTSE) हि परीक्षा दिली.यात त्याने बहुपर्यायी प्रश्न व मुलाखत अशा दोन परीक्षा दिल्या.त्यात बहुपर्यायी प्रश्नात 100 पैकी 69 गुण व मुलाखतीमध्ये 150 पैकी 112 गुण मिळवून महाराष्ट्रातील 50 विद्यार्थ्यांमध्ये याची निवड भारतीय अंतराळ संशोधन केंद्रामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी झाली.या परीक्षेसाठी पूर्वेशने जनरल नॉलेज,सायन्स च्या पुस्तकांचे वाचन केले.तसेच शाळेतील शिक्षकांचे व त्याच्या पालकांचे मार्गदर्शन लाभले.त्याने या परीक्षेसाठी अथक परिश्रम घेतले व यश संपादन केले.पूर्वेशच्या या यशाबद्दल शाळेचे संस्थापक श्री.प्रशांत पाटील सर,प्राचार्या सौ.वैशाली लाडे मॅम व्यवस्थापक श्री.तुषार देवरे सर, श्री.वैभव सोनवणे सर,श्री.राहुल अहिरे सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अभिनंदन केले व भावी आयुष्यासाठी सर्वांनी पूर्वेशला शुभेच्छा दिल्या.