चौफेर न्यूज – नॅशनल बोर्ड ऑफ एक्सामिनेशन कडून National Eligibility cum Entrance Test for Post Graduate (NEET-PG)चं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. आज nbe.edu.in वर नीट पीजी 2021 परीक्षेची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये वैद्यक्षेत्रातील प्रवेश परीक्षेच्या संदर्भातील महत्त्वाच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. आज (23 फेब्रुवारी) नीट पीजी परीक्षा 2021 च्या अप्लिकेशनसाठी दुपारी 3 वाजल्यापासून सुरूवात होणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना हे ऑनलाईन अप्लिकेशन 15 मार्च पर्यंत खुलं असेल.  यंदा नीट पीजी 2021 परीक्षा 18 एप्रिल 2021 ला होणार आहे. या परिक्षेद्वारा मास्टर ऑफ सर्जरी साठी 10,821 जागांसाठी, डॉक्टर ऑफ मेडिसिन साठी 19,953 आणि डिप्लोमा पीजी साठी 1979 जागांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये 6102 सरकारी, खाजगी, डिम्ड आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीज द्वारा प्रवेश दिला जाईल.

नीट पीजी 2021 परीक्षा महत्त्वाच्या तारखा

NEET PG application – 23 फेब्रुवारी 2021 पासून सुरू होणार

नीट अ‍ॅप्लिकेशन साठी अंतिम तारिख – 15 मार्च 2021

नीट पीजी परीक्षा – 18 एप्रिल 2021

नीट पीजी परीक्षा निकाल – 31 मे पर्यंत

यंदा 18 एप्रिल 2021 ला होणारी परीक्षा ही कम्युटर बेस्ड होणार आहे.

दरम्यान नीट पीजी 2021 परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडे एमबीबीएस डिग्री प्रोव्हिजनल किंवा परमनंट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. तसेच नीट पीजी 2021 देऊ इच्छिणार्‍यांकडे 30 जून पर्यंत किंवा एका वर्षाच्या इंटर्नशीपची पूर्तता केलेली असावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here