चौफेर न्यूज – अनेकदा लांबलेली महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा अखेर रविवारी संपुर्ण राज्यात पार पडली खरी, पण या परीक्षेला विद्यार्थ्यांनी मात्र पाठ फिरवल्याचे चित्र संपुर्ण राज्यात होते. अनेक केंद्रांवर परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांचा निरूत्साहच असल्याचे चित्र होते. राज्यातील अनेक केंद्रावर मोठी अशी हजारोंच्या संख्येत अशी दांडी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी मारल्याचे चित्र पहायला मिळाले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वारंवार पोस्टपोन होणाऱ्या वेळापत्रकावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करत राज्यभरात याआधी आंदोलन केले होते. त्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी या विषयात लक्ष घालत आठवड्याभरात परीक्षा होईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतरच रविवारी परीक्षा झाली खरी पण अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेला मात्र दांडी मारली. राज्यात परभणी, नाशिक, सोलापूर यासारख्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची अनुपस्थिती परीक्षेसाठी दिसून आली.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी मात्र अनेक विद्यार्थी गैरहजर राहिले. परभणीत जवळपास १४०० विद्यार्थी परीक्षेसाठी गैरहजर असल्याचे आढळले आहे. दोन्ही सत्रातील पेपरसाठीही वेगवेगळी अशी हजेरी दिसून आली. सकाळी १० ते १२ दरम्यानच्या पेपरसाठी त्यासाठी परभणीत ३९०७ पैकी २५०८ विद्यार्थी उपस्थित राहिले. तर १३९९ जणांनी परीक्षेसाठी दांडी मारली. दुपारच्या सत्रातही ३ ते ५ दरम्यानच्या पेपरसाठी जवळपास १४०९ विद्यार्थी गैरहजर होते. जवळपास चौथ्यांदा रद्द झालेल्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी परभणीतही आंदोलन केले होते. नाशिकमध्येही जवळपास ६ हजार विद्यार्थी परीक्षेसाठी गैरहजर होते असेच चित्र पहायला मिळाले. नाशिकमध्ये ४६ केंद्रावर झालेल्या परीक्षेसाठी १८ हजार ७१ पैकी केवळ ११ हजार ८०१ विद्यार्थी हजर होते. तर दुपारच्या सत्रात ११७४८ विद्यार्थी उपस्थित होते तर ६३२३ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारणे पसंत केले. सोलापूरातूनही परीक्षेला ३ हजार विद्यार्थ्यांनी दांडी मारल्याचे चित्र पहायला मिळाले. एकुण ८ हजार ८७९ विद्यार्थी परीक्षा देणार होते. पण त्यापैकी पहिल्या सत्रात ५ हजार ३४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ३ हजार विद्यार्थी ५५१ विद्यार्थ्यांची दुपारच्या सत्रात गैरहजर होती.