चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल येथे 23 मार्च शहीद दिनाबद्दल कार्यक्रम आयोजित करण्यात आला.याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ.वैशाली लाडे मॅडम,सौ.भारती पंजाबी मॅडम व्यवस्थापक श्री.वैभव सोनवणे सर यांच्या हस्ते भगतसिंग,राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी सौ.वैशाली पाटील मॅडम यांनी शहीद दिनाबद्दल माहिती देतांना सांगितले की 1928 मध्ये सायमन कमिशन लाहोर मध्ये झाले.त्यावेळी मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या लाला लजपतराय यांना स्कॉट व साँडर्स या इंग्रज अधिकाऱ्याकडून मारहाण झाली.त्यामुळे त्यांचे निधन झाले.याचा सूड म्हणून भगतसिंग,राजगुरू व सुखदेव यांनी साँडर्सला गोळ्या घालून ठार केले.अत्यंत हितकारक अशा सार्वजनिक सुरक्षा बिलावर दिल्ली पार्लमेंट मध्ये चर्चेच्या वेळी वंदे मातरमच्या घोषणा देत भगतसिंग व त्यांच्या साथीदारांनी अध्यक्षांच्या दिशेने बॉम्ब फेकले व पार्लमेंटमध्ये बोमस्पोट या खटल्यात भगतसिंग,राजगुरू व सुखदेव यांना तिघांना 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या कारागृहात फाशी देण्यात आली.त्यांचा हा स्मृति दिन होय असे विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.