चौफेर न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीच्या प्रथम सत्र परीक्षा येत्या दोन आठवड्यात संपणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या सत्राच्या परीक्षा जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतील.त्यासाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे.
विद्यापीठाने पदव्युत्तरनंतर आता पदवीच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे शिक्षकांना पुन्हा ऑनलाइन परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक कामांना सुरुवात करावी लागणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यांमधील सुमारे सहा लाख विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेतली जात आहे.