पितृदिना निमित्त इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या संचालिका कमला बिष्ट यांचे प्रतिपादन.
चौफेर न्यूज – पाल्याचे चिमुकले हात धरून जे आपल्याला चालायला शिकवतात, ते बाबा असतात. पाल्याने काही चांगले केल्यावर जे अभिमानाने सगळ्यांना सांगतात, ते बाबा असतात. माझ्या पाल्याला काही कमी पडू नये यासाठी जे सदैव धडपडत असतात, ते बाबा असतात. आयुष्याच्या मार्गावर चालताना जे पाल्याला चुकताना सावरतात, ते बाबा असतात.
अशा बाबांचा दिवस नुकताच संपन्न झाला. या दिनाच्या निमित्ताने मोशी-चिखली येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूल मध्ये “फादर्स डे” चे आगळेवेगळे आयोजन करण्यात आले.
वडिलांना समर्पित असलेला पिता दिवस विशेष करून वडिलांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला गेला. पित्याला ईश्वर स्थानी मानून, एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांकडून आपल्या पित्याचे पाद्यपूजन करण्यात आले. त्यांचे औक्षण करून, तिलक लावून त्यांच्या कडून आशीर्वाद घेण्यात आले.
सर्व विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त करताना, आगळा-वेगळा उपक्रम म्हणून कार्ड पेपरवर विद्यार्थी आणि त्यांचे वडील यांच्या हाताचा एकत्रित रंगीत ठसा घेणेत आला. हा एकीकरणाचा ठसा, हा मजबुतीचा ठसा पाल्य आणि पिता यांच्या कायम स्वरूपी स्मरणात राहील असे भावूक होऊन पालकांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
विद्यार्थ्यांनी स्व:हस्ताक्षरात भेट कार्डे बनवून वडिलांना दिली. सर्व विद्यार्थी आणि पालकांनी उपक्रमामध्ये आदर पूर्वक सहभाग घेतला. या उपक्रमातील पित्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू आम्हाला नेहमी स्फुरण देतील असे प्रतिपादन सर्व शिक्षकांनी केले.
याप्रसंगी संचालिका कमला बिष्ट यांनी पालकांना शुभेच्छा दिल्या. ऑनलाईन असलेल्या या अविस्मरणीय उपक्रमात सर्व शिक्षकांनी आपल्या वर्गावर उपस्थित राहून उपक्रमाचे नियोजन केले. देबोश्री भोंडवे, दिशा कंसारा, चंद्रकला कापरी, निशा पाटील, प्रीती साबने, कृष्णा राणा, अदिती एकवडे, प्रेमलता केंजळे, तन्वी नाशिकर, अनुराधा डिक्कर, रोहिणी भोसले, तमाळी डे, निरुपमा काकडे, संसिया लूद्राज, सुजाता शेलार, सिद्धी सावंत, कल्यानी साजन आणि पुष्कर कापरी आदी शिक्षिकांचे मार्गदर्शन मुलांना लाभले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या वडिलांच्या विषयी कविता सादर केल्या. पालकांनी मनोगते व्यक्त करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले.