चौफेर न्यूज – विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे मैस्को इंग्रजी शाळा संस्थाध्यक्ष संघटनेच्यावतीने मसनात नेऊ नका निदर्शने आंदोलन यशस्वीपणे संपन्न.. यावेळी मेस्कोचे प्रदेशाध्यक्ष गजानन पाटील वाळके, मराठवाडा अध्यक्ष अॅड. कैलास जारे, सचिन जाधव व जिल्हा सचिव गणेश सुलताने, बाबासाहेब सोळंके, ज्ञानेश्वर बरबडे यांचे नेतृत्वाखाली धरणे आंदोलन पार पडले. यावेळी संस्थाचालकांनी मसनात नेऊ नका है पथनाट्य सादर करून उपस्थितांची व प्रसारमाध्यमांची मने आकर्षित केली. माननीय आयुक्त साहेब यांनी मेस्को इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेच्या सर्व १२ मागण्या शासन दरबारी मांडणार असल्याचे आश्वासन दिले. सदरील संघटनेच्या बारा मागण्यांसाठी मेस्को इंग्रजी शाळा संस्थाध्यक्ष संघटना कायम प्रयत्नशील राहील व पाठपुरावा चालूच राहील…|
मेस्को इंग्रजी शाळा संस्थाध्यक्ष संघटनेचे २७ जुलै, २०२१ रोजी औरंगाबादेत विभागीय आयुक्त कार्यालया समोर म्हसणात नेवू नका आंदोलन आर.टी.ई. मोफत प्रवेश प्रतिपूर्तीची मागील तीन वर्षाची थकित रक्कम तात्काळ मिळावी, सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे पालकांनी शाळेची फीस भरणा करण्याबाबत शासनाने तातडीने परिपत्रक निर्गमित करावे, विना टी. सी. प्रवेश परिपत्रक रद्द करावे, शाळा इमारतीस लाईट बिल व मालमत्ता करात 50% सवलत देवून कोरोनाकाळातील 100% माफ करावे, स्कूल बस टॅक्स रद्द करावा, फिस मध्ये सवलत देवूनही वर्षभर फीस न भरणाऱ्या पालकाच्या पाल्याचा प्रवेश रद्द करून शाळांना कायदेशीर कारवाई करण्याबाबत शासन अध्यादेश काढावा, शाळेशी संबंध नसलेल्या व्यक्तिंना शाळा प्रवेशबंदी करुन संरक्षण कायदा पारित करावा, आर.टी.ई. प्रतिपूर्ती रक्कम शाळेच्या फीस प्रमाणे व कायदयानुसार वर्षातून दोन टप्यात विनाअट मिळावी, आर.टी.ई. अंतर्गत मोफत शिक्षण नर्सरी ते इयत्ता 12 वी पर्यंत करावे. खाजगी व विनाअनुदानित शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके गणवेश व शालेय पोषण आहार मोफत देण्यात यावा आदीसह विविध मागण्यांसाठी अनेक वेळा आंदोलने करूनही शासनाकडे मागण्या अद्याप प्रलंबीतच आहेत. तसेच कोरानामुळे पालकांकडे दोन वर्षाची फीस बाकी असुन, शासनाकडे RTE 25% प्रतिपूर्तीची रक्कम तीन वर्षाची थकित आहे.
त्यामुळे राज्यातील सर्व इंग्रजी शाळा आर्थिक संकटात आल्याने शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी वेतन ; इमारतभाडे ; मालमत्ता कर बँक हप्ते थकले ; परंतू शासनाने कुठलीही मदत तर केलीच नाही उलट शाळा विरोधी धोरण स्विकारल्याने इंग्रजी शाळा प्रमुख डिप्रेशन मध्ये जावून आत्महत्येचा प्रयत्न करीत आहेत.
मंगळवार 27 जूलै रोजी सकाळी 11: 00 विभागीय आयुक कार्यालय दिल्ली गेटजवळ औरंगाबाद येथ मेस्को इंग्रजी संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष गजानन पाटील वाळके, राज्य उपाध्यक्ष सचिन जाधव, मराठवाडा अध्यक्ष अॅप कैलास जारे उपाध्यक्ष नवनाथ गोड जिल्हाध्यक्ष संजय लहाने जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद आरसुळ डॉक्टर गंगाधर पांढरे जिल्हा सचिव गणेश सुलताने जिल्हा संघटक ज्ञानेश्वर बरबडे जिल्हा नेते विठ्ठल राव मस्के डॉक्टर प्रसाद मदन डॉक्टर विठ्ठलराव पवार यांच्या नेतृत्वाखाली म्हसणात नेवू नका है आगळे – वेगळे निदर्शने आंदोलन करून त्या माध्यमातून इंग्रजी शाळांच्या समस्या मांडून शासनाचे लक्ष वेधु पाहत आहे. मेस्को इंग्रजी शाळा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गजानन पाटील वाळके, राज्य उपाध्यक्ष सचिन जाधव, मराठवाडा अध्यक्ष अॅड. कैलास जारे उपाध्यक्ष नवनाथ दौड, जालना जिल्हाध्यक्ष संजय लहाने, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद आर्टूड, डॉ. गंगाधर पांढरे, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर बरबडे, जिल्हा सचिव गणेश सुलताने, जिल्हा नेते विठ्ठलराव पाटील मस्के, डॉ. विठ्ठलराव पवार, डॉ. प्रसाद मदन, रणवीर देशमुख, तालुकाध्यक्ष बाबासाहेब सोळंके, निवृत्ती बिटले, शेख रियाज, लक्ष्मण साबळे, सुभाष निर्वळ, शिवाजी जाधव, गोरे सर, जाधव सर, अंबादास खरात, अॅड. निवृत्ती मदन, संतोष मुळे, व्यंकटेश शेळके, शिवाजी पाटील, बनकर सर, केशव फिसके, अर्जुन पवार, देशमुख सर, पुरुषोत्तम भोपळे, प्रवीण बोडखे, धर्मराज माने, राखुंडे, अमोल उंचे, भूमकर सर आदींनी केले आहे.