स्विकृत नगरसेवक सुनील कदम यांचे विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन !!!
चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने खासगी शाळेतील १०वी आणि१२वी मधील ८०%ते ९०% च्या पुढे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्विकृत नगरसेवक सुनील कदम यांनीआकुर्डी परिसरातील विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.
या योजनेच्या माध्यमातून १०वी मध्ये ८०%ते ९०% पर्यंत १०हजार रुपये, १०वी मध्ये ९०%पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांना १५हजार रुपये तर १२ वी मध्ये ८०% पेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना १५हजार रुपये अर्थसहाय्य महापालिका प्रशासनाकडून देण्यात येणार आहे.
यासाठी विदयार्थ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे. त्या करिता विदयार्थ्यांनी जय भवानी कलेक्शन पाठीमागे, सार्थक बंगला,विठ्ठलवाडी या ठिकाणी आपली मार्क शीट घेऊन संपर्क साधावा येताना मास्क बंधनकारक आणि सोशल डिस्टन्स चे नियम पालन करणे गरजेचे असल्याचे भाजपचे स्विकृत नगरसेवक सुनील कदम यांनी सांगितले आहे.