चौफेर न्यूज – दिनांक 15 /8/2021रविवार् प्रचिती पब्लिक स्कूल येथे 75वा “स्वातंत्र्य दिन ” साजरा करण्यात आला.
उत्सव तीन रंगाचा ,
आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी हा भारत देश घडविला l
शासनाच्या कोरोना संबधित नियमांचे पालन करून “स्वातंत्र्य दिन” उत्सवात साजरा करण्यात आला . कार्यक्रमस्थळी सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली. कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक श्री राहुल पाटील उपस्थित होते व त्यांनी दीप प्रज्वल करून ध्वज स्तभाचे पूजन करण्यात आले व् त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. सर्वांनी ध्वजास् सलामी देऊन राष्ट्रगीत गायले. “भारत माता की जय ” असे नारे देण्यात आले. कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षिका अनिता पाटील, अर्चना देसले, ज्योती खैरनार व शिक्षेकेतर कर्मचारी संगीता कोठावदे इत्यादी उपस्थित होते. 75 व्या स्वातंत्र्य दिना निमित्त शाळेच्या विद्यार्थि विविध स्पर्धत् सहभाग घेतला.