चौफेर न्यूज – जहा डाल डाल पर सोनेकी चिडीया करती है बसेरा वो भारत देश है मेरा अशा सुंदर वर्णन ज्या माझ्या भारत देशाचे केले जाते त्या माझ्या देशाच्या 75 वा स्वातंत्र्यदिनी कोरोना काळात जे देशासाठी लढत आहेत असे करोना योद्धा माननीय श्री. दिनेश आहेर सर (साक्री,तालुका पीआय)व माननीय श्री.डॉ.के.के.तडवी सर (साक्री तालुका हेल्थ ऑफिसर )हे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला लाभले. यांच्या हस्ते भारत मातेचे प्रतिमा पूजन करून ध्वजा रोहन करण्यात आले याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ. भारती पंजाबी मॅडम, प्रचिती पब्लिक स्कूल च्या प्राचार्या सौ. वैशाली लाडे मॅडम, व्यवस्थापक श्री.वैभव सोनवणे सर श्री. तुषार देवरे सर, एक दिवसीय उप प्राचार्य श्री. नितीन राजपूत सर,शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते
ध्वजारोहणानंतर मोठ्या उत्साहात ध्वज गीत गीत सादर करण्यात आले.कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथींचे करोना योद्धा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.निशांत देसले, नेहा पाटील, राधिका देवरे,पल्लवी वाघ, सानिया शाह,यांनी देशाविषयी चा अभिमान आपल्या भाषणातून व्यक्त केला. देशाविषयी असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर करून आपला जल्लोष व्यक्त केला तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांनी लोकशाही पद्धतीने राज्यकारभार योग्य की अयोग्य आधारित चर्चासत्रात भाग घेतला ज्यांनी आपल्या देशासाठी रक्ताचे बलिदान केले त्यांचे स्मरण करून देण्यासाठी नर्सरी ते पहिलीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पोशाख परिधान करून स्मरण करून देत घोषवाक्य सादर केली. दुसरीच्या विद्यार्थ्यांनी तिरंगी रंगाचे महत्व समजावून देण्यासाठी वेगवेगळ्या क्राफ्ट ॲक्टिविटी मध्ये सहभाग घेतला तिसरी च्या विद्यार्थ्यांनी सगळे पालक ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही म्हणून आपल्या पालकांना तिरंगी रंगाचा पोशाख परिधान करावयास लावून पालकांना सुद्धा या कार्यक्रमात सहभागी करून घेतले करोना कालावधीत आहाराचे महत्त्व अधिक आहे आणि या शुभ दिनाचे औचित्य साधून तिरंगा रंगाचे विविध खाद्यपदार्थांच्या थाळ्यांचे प्रदर्शन केले. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत गाऊन अंगात संचारलेल्या देशभक्तीचे प्रदर्शन केले
शाळेतील शिक्षिका. सपना देवरे यांनी स्वतंत्र दिनानिमित्त विचार व्यक्त करून कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला.कार्यक्रमाला उपस्थित करोना योद्धा माननीय श्री.आहेर सर यांनी स्वतंत्र दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले की आपणा सर्वांना एकमेकांच्या मदतीने करोना संपवायचा असेल तर आपण शिस्तबद्ध पद्धतीने वागून आपल्या देशाला करोनमुक्त करूया. तसेच कार्यक्रमाला उपस्थित दुसरे मान्यवर माननीय श्री.के.के तडवी साहेब, यांनी आपल्या वक्तव्यातून सांगितले की मास्क वापरून सॅनिटायझर चा वापर करून आपण करोनावर मात केली आहे करोनावर मात करण्यात अधिकाऱ्यांसोबत जनतेचा मोठा हात आहे त्यानंतर प्राचार्या सौ.भारती पंजाबी मॅडम यांनी आपल्या भाषणात व्यक्त करताना सांगितले की भारताने मुक्त श्वास घेऊन आपल्या प्रगतीचा प्रवास सुरू केलेला आहे आपण आपला देश भ्रष्टाचारमुक्त करू या आजच्या करोनाच्या च्या कठीण प्रसंगात नियमांचे पालन करून आपल्या देशाला वाचवूया आणि प्रगतीच्या पथावर जाऊया.
या कार्यक्रमासाठी सुंदर असे फलक लेखन करून रांगोळी चे रेखाटन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीचे विद्यार्थी त्रिनयन पाटील व वेदांत भामरे,यांनी केले या कार्यक्रमासाठी प्राचार्य सौ.भारती पंजाबी मॅडम, समन्वयक श्री. वैभव सोनवणे सर समन्वयक श्री.तुषार देवरे सर,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.