चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये तालुकास्तरीय कुस्ती व बुद्धिबळ या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . याप्रसंगी विद्येची देवता सरस्वती माता व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या प्राचार्या सौ भारती पंजाबी मॅडम साक्री तालुका क्रीडा शिक्षक (प्रमुख अतिथी) संजय भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी क्रीडा शिक्षक महेश मराठे सर यांनी खेळांनी व्यायाम होतो. शरीर बळकट होते. खेळातील शिस्त जीवनाला ही वळण देते .दोन चार तास अभ्यास केल्यावर कंटाळा येतो. त्यानंतर थोडावेळ खेळल्यावर कंटाळा पळून जातो आणि अभ्यासासाठी पुन्हा उत्साह येतो .खेळात मनाची एकाग्रता साधता येते. चापल्ले येते. खेळांचाही अभ्यास करावा लागतो. खेळायला ही सराव लागतो आणि खेळासाठी ही उत्तम मार्गदर्शक गुरु असावा लागतो. खेळ म्हटला की यश अपयश आलेच .कधी हार होणार ,कधी जीत होणार ,पण हार ही हसत स्वीकारता आली पाहिजे . हरणारा खेळाडू जिंकलेल्या खेळाडूचे प्रथम अभिनंदन करतो. खेळातून येणारी ही खेळाडू वृत्ती जीवनात फार उपयोगी पडते. प्रत्येकाला आपल्या जीवनात केव्हा ना केव्हा संकटाला तोंड द्यावे लागते. कधी हार पत करावी लागते. अशावेळी खिलाडू वृत्ती असेल तरच आपण पुढे जातो. अपयशाने खचून जाणाऱ्या हातून काहीच घडत नाही. जशी हार तशी जीत, हार झाल्याने खचून जाऊ नका .तसेच, जीत झाल्याने फुगून जाऊ नका, असे सच्चा खेळाडू सांगतो. खेळातील जय ज्याप्रमाणे संयमाने स्वीकारावा , तसा जीवनातील विजय विनम्रतेने स्वीकारावा .खेळात हारजीत असली तरी खेळ खेळले जातात ते मैत्रीसाठी, एकमेकांचे कौतुक करण्यासाठी, स्नेहाचा हात पुढे करण्यासाठी, खेळांमुळेच आपली उत्साही वृत्ती टिकून राहते असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . याप्रसंगी प्रथम मशाल पेटवून कुस्ती या खेळाची सुरुवात करण्यात आली. कुस्ती या खेळाचे पंच गोरख पाटील सर होते. बुद्धिबळ या खेळाचे निरीक्षक सुनील कोतकर होते . याप्रसंगी साक्री तालुका क्रीडा समन्वयक श्री संजय सखाराम भामरे , साक्री तालुका सह क्रीडा समन्वय श्री. धनंजय विश्वनाथ घरटे, साक्री तालुका सहक्रीडा समन्वयक श्री. महेश ज्ञानेश्वर मराठे, श्री .दगडू तुळशीराम ठाकरे, श्री. लक्ष्मीकांत हरी शिंदे ,श्री. अशोक चैत्राम सोनवणे, श्री. बन्सीलाल संतोष बागुल, साक्री तालुका क्रीडा मार्गदर्शक श्री. धनंजय लक्ष्मण सोनवणे,श्री .अनिल शांताराम पाटील प्रचिती स्कूलच्या उपप्राचार्या सौ वैशाली लाडे मॅम ,प्रचिती स्कूलचे व्यवस्थापक श्री. वैभव सोनवणे सर व श्री तुषार देवरे सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्मिता नेरकर मॅडम यांनी केले.