चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये विज्ञान व सामाजिक शास्त्रावर आधारित विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी व परीक्षक लाभलेल्या डॉक्टर व्ही .एन .शिंदे. प्राध्यापक काकडे. सौ .ऋतुजा देवरे, श्री. उमाकांत देशपांडे, सौ. वृषाली भदाणे, सौ .कविता कुवर, सौ. प्रियदर्शनी पाटील, श्री. सुनील मोहने ,सौ. विद्या कांबळे, सौ. वैशाली देसले या अतिथींच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ.भारती पंजाबी मॅम, सौ. वैशाली लाडे मॅम ,व्यवस्थापक श्री. वैभव सोनवणे सर, श्री. तुषार देवरे सर उपस्थित होते .या प्रसंगी चंद्रावर पदार्पण करणाऱ्या देखाव्याचे प्रदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्मिता नेरकर मॅम व रामोळे सर यांनी केले. इयत्ता दुसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी या विषयावर आधारित नाटक व नृत्याचे प्रदर्शन केले. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तयार केले गेलेले यंत्रमानव रोबोट ने कुशल पद्धतीने कार्य कसे करावे याचे प्रात्यक्षिक स्वरूपात प्रदर्शन केले. या प्रदर्शनासाठी नर्सरी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयावर आधारित विद्युत ऊर्जा प्रकल्प ,पवन ऊर्जा प्रकल्प ,ईव्हीएम मशीन, सौर ऊर्जा प्रकल्प ,रेन हार्वेस्टिंग ,एटीएम मशीन, वॉशिंग मशीन, पर्जन्यमापक , कुलर ,एअर पॉल्युशन, सोलर सिटी रिफ्लेक्शन ऑफ लाईट, सॉईल इरिगेशन, ग्लोबल वॉर्मिंग ,रेड फोर्ट ताजमहल ,सॅटेलाईट कम्युनिकेशन टेम्पल, वॉटर सायकल, एग्रीकल्चर प्रोसेस, ज्वालामुखी ग्रह, उपग्रह, अभयारण्य इत्यादी वेगवेगळ्या स्वरूपातील प्रोजेक्टचे मॉडेल तयार केले व त्याविषयी सर्व माहिती प्रदर्शित केली. या सर्व प्रोजेक्टचे परीक्षण करण्यात आले . उत्तम मॉडेल व उत्तम वकृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांचे क्रमांक काढण्यात आले .या प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शाळेतील सर्व पालक वर्गाने विद्यार्थी वर्गाने उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाचे संयोजन मुकुल सोनवणे सर, दीपक चौधरी सर ,गणेश नांद्रे सर, स्मिता नेरकर मॅम, सपना देवरे मॅम, जागृती जाधव मॅम यांनी केले. या कार्यक्रमासाठी सुंदर फलक लेखन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वर्गाने व कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.