चौफेर न्यूज – सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सीबीएसईच्या दहावी च्या परीक्षा 15 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार असल्याचे सीबीएसईने म्हटले आहे.
जे विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत ते सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जाऊन वेळापत्रक पाहू शकतात. या शिवाय, https://www.cbse.gov.in/cbsenew या लिंकद्वारे सीबीएसईच्या इयत्ता 10वी परीक्षेचे वेळापत्रक थेट पाहू शकतात. सीबीएसईने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार इयत्ता 10वी सायन्सची परीक्षा 4 मार्च 2023 रोजी, तर गणिताची परीक्षा 21 मार्च 2023 रोजी होईल.
सीबीएसईच्या इयत्ता 10वीच्या परीक्षा 21 मार्च 2023 रोजी संपणार आहेत. सीबीएसईने 10वी च्या विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान पाळण्याची मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत. सीबीएसईने 27 डिसेंबर 2022 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर 10वी च्या CBSE बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षांची तारीख आधीच जाहीर केली आहे. प्रात्यक्षिक परीक्षा 2 जानेवारी 2023पासून सुरू होतील आणि 14 फेब्रुवारी 2023 रोजी संपतील. प्रात्यक्षिक परीक्षेची संपूर्ण तारीखपत्रक पाहण्यासाठी विद्यार्थी अधिकृत वेबसाइट www.cbse.gov.in ला भेट देऊ शकतात. यासोबतच सीबीएसईने शाळांना 2 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2023 दरम्यानच्या विद्यार्थ्यांचे ग्रेड आणि गुण अपलोड करण्यास सांगितले आहे.
सीबीएसई 10वी परीक्षेचे वेळापत्रक असे पाहू शकता – सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर पाहू शकता.