चौफेर न्यूज – CBSE बोर्डाच्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेचे (CBSE Exam 2023) वेळापत्रक जाहीर झाले आहे. CBSE च्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा 15 फेब्रुवारीला सुरू होणार असून 5 एप्रिल 2023 ला संपणार आहे.
परीक्षेबाबतचे सर्व महत्त्वाचे नियम, तसेच प्रात्यक्षिक परीक्षांबाबतची सर्व माहिती अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. प्रात्यक्षिक परीक्षांची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. 12 वी ची प्रात्यक्षिक परीक्षा 2 जानेवारी, 2023 पासून सुरू होणार असून, 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत ही परीक्षा असेल.
अशा प्रकारे Download करा CBSE 12 वी परीक्षेचे वेळापत्रक (CBSE Exam 2023)
- CBSEच्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाईट किंवा cbse.nic.in. या अकॅडमिक वेबसाईटवर जा.
- वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी एक लिंक उपलब्ध असेल त्यावर क्लिक करा.
- word file किंवा PDF डाउनलोड करा. ( CBSE Exam 2023) अशाप्रकारे 12 वी परीक्षेचे वेळापत्रक डाउनलोड करता येईल. CHART