पिंपळनेर प्रचिती पब्लिक स्कूल येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमीत्त कार्यक्रम
पिंपळनेर : ‘पारावरचा वड तमाशा तला फड आणि देवीचा गड म्हणजे महाराष्ट्र. आंबा, संत्री, साग आणि माणसातला वाघ म्हणजे महाराष्ट्र. कपाशी, तुर, ज्वारी आणि पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्र. होळी आणि पुरणाची पोळी म्हणजे महाराष्ट्र, अशा शब्दांत महाराष्ट्र दिनाचे वर्णन मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी केले. पिंपळनेर येथील प्रचिती पब्लीक स्कूल येथे महाराष्ट्र दिना निमीत्त आयोजित कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या.
संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संयोजन राहूल अहिरे यांनी केले. प्रसंगी ध्वजारोहण कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला. कामगार दिन व महाराष्ट्र दिनाबद्दल काजल राजपूत यांनी माहिती दिली. शाळेचे संयोजक व प्रमुख अतिथी राहुल पाटील यांनी सुजलाम सुफलाम महाराष्ट्राबाबत माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना मैम यांनी केले. मयुरी सोनार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. आभार धनश्री आधाव यांनी मानले.