पिंपळनेर : “नाच ग घुमा” या सिनेमाच्या प्रमोशनसाठी मराठी सिनेकलाकार स्वप्निल जोशी यांनी पिंपळनेर येथे मंगळवारी भेट दिली. प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर व पीव्ही सिनेमा यांच्यातर्फे पी. व्ही. सिनेमागृहात प्रमोशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वर्किंग वुमन, संसार, नोकरी, मुल, घर, कर्ज या रगड्यात अडकलेल्यांची छोटी स्वप्नही मनातच राहतात. मन म्हणतय “नाच ग घुमा” पण “कशी मी नाचू” ….असे ज्यांना वाटतं, त्यांनी हा सिनेमा पाहावा, म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चॉकलेट बॉय, मराठी चित्रपटाचा बादशाह, रामायण तसेच, चित्रपटात मुख्य भूमिका वठवणारे “नाच ग घुमा” चित्रपटाचे निर्माते स्वप्निल जोशी यांचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. प्रचिती पब्लीक स्कूलमध्ये स्वप्निल जोशी यांचे स्वागत शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील यांनी मोठया उत्साहात केले. शाळेच्या सेक्रेटरी कविता पाटील, राहुल अहिरे, प्रचिती पाटील, स्वरा पाटील यांच्यासह शाळेच्या विद्यार्थिनींनी फुलांचा वर्षावाने त्यांचे स्वागत केले. तसेच, प्रचिती पब्लिक स्कूलच्या शिक्षिका रिनल सोनवणे यांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. स्वप्निल जोशी यांनी पी व्ही सिनेमा हॉलमध्ये प्रवेश करताच प्रेक्षकांनी टाळयांनी एकच जल्लोष केला. प्रशांत पाटील यांनी स्वप्निल जोशी यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. स्वप्निल जोशी यांनी सर्वांचे प्रेम पाहून आभार व्यक्त केले. महाराष्ट्रीयन रुचकर भोजन पुरणपोळीचा आस्वाद घेतला.
प्रचिती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी “नाच ग घुमा” या गाण्यावर सुंदर नृत्य सादर केले. स्वप्निल जोशी यांनी देखील अक्षंदा कापडणीस, अवनी कापडणीस, श्रावणी शेवाळे, मानसी शेवाळे, नेहा साबळे, प्रांजल सूर्यवंशी, वैष्णवी भामरे, देवयानी शेवाळे, हर्षदा शेवाळे , अनुष्का अहिराव या विद्यार्थिनींसोबत ठेका धरत नृत्य सादर केले. तसेच, प्रचिती पब्लिक स्कूलच्या सर्व शिक्षिकेंचेही कौतुक केले. “नाच ग घुमा” सिनेमा या कार्यक्रमानिमित्त पालक वर्ग यांचा उत्साह, आनंद ही मोलाचा ठरला. प्रचिती पब्लिक स्कूलच्या प्राचार्या अनिता पाटील यांच्याशी संवाद साधत सर्व शिक्षकांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच, विद्यार्थी शिक्षकांचा सेल्फीचा हटट पूर्ण केला. पी. व्ही. सिनेमा हॉलचे मालक यांचे सहकार्य देखील मोलाचे ठरले. प्रचिती इंटरनॅशनल स्कूल साक्रीच्या प्राचार्या वैशाली लाडे, समन्वय तुषार देवरे, वैभव सोनवणे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार “नाच ग घुमा” हा कार्यक्रम यशस्वी झाला. प्रचिती पब्लिक स्कूलच्या अर्चना देसले, अश्विनी पगार, किरण देवरे, रीनल सोनवणे, कल्याणी काकुस्ते, मंगला बहिरम, श्वेता सोनवणे, मयुरी सोनार, सरिता अहिरे, वैशाली वाघ, तेजल पंडित, धनश्री आघाव यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी भोजनाचा आस्वाद घेतला.