शिक्षण महर्षी प्रशांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कपडे, फळे व फराळाचे वाटप
पिंपळनेर : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष तथा शिक्षण महर्षी प्रशांत भीमराव पाटील यांचा वाढदिवस आदिवासी वस्तीतील लोकांसोबत साजरा केला. वाढदिवसाच्या अनावश्यक खर्च टाळत आदिवासी वस्तीतील लोकांचा आनंद द्विगुणित व्हावा, यासाठी प्रचिती पब्लिक स्कूलतर्फे आदिवासी वस्तीतील मुले, तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना कपडे, फळे व फराळाचे वाटप करण्यात आले.
शाळेचे समन्वयक राहुल अहिरे यांच्यासह शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग यांच्याहस्ते कपडे, फळे व फराळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांना खानदेश मराठा पाटील समाजाच्या वतीने शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार, खानदेश रत्न पुरस्कार मिळाला आहे. तसेच, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते धुळे जिल्ह्यातील उत्कृष्ट शाळा पुरस्कार देवून गौरविण्यात आलेले आहे. शिक्षण क्षेत्राला आधुनिक बनविणारे ज्ञान महर्षी, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भीमराव पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे राहुल अहिरे यांनी सांगितले. याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच आदिवासी वस्तीवरील लोकांनी श्री. प्रशांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.