प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पूजन प्राचार्या वैशाली लाडे, शाळेचे समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्या हस्ते झाली. शाळेचे कर्मचारी बंदिश खैरनार यांनी ध्वजपूजन व ध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, वाहन चालक यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गाऊन महाराष्ट्र दिनाच्या जय जयकार केला.
शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे यांनी १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे महत्त्व विषद केले. महाराष्ट्र ही सुजलाम सुफलाम भूमी आहे. ही संतांची भूमी आहे तसेच कष्टकरी काम करी यांची ही भूमी आहे आणि म्हणून एक मे रोजी आपण महाराष्ट्र दिन व कामगार दिन देखील साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. तसेच, ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रसंगी, सर्व कामगारांना कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. ध्वज संचलनाची सूचना कुणाल देवरे यांनी दिली. सुंदर असे फलक लेखन भूपेंद्र साळुंखे यांनी केले. व्यासपीठाची सजावट हेमांगी बोरसे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना देवरे यांनी केले.