पिंपरी :- मारूंजी येथील कोलते पाटील सोसायटी जवळील मोकळ्या मैदानात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही घटना बुधवारी (दि. ४) सकाळी उघडकीस आली.

मारुंजी येथे मोकळ्या मैदानात एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना बुधवारी सकाळी मिळाली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. मृतदेहाच्या जवळ बिअरच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. रात्री दारू पिल्यानंतर झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here