पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये केंद्रीय संयुक्त कृती समितीच्या आदेशानुसार १०० टक्के संप यशस्वी झाला. या संपामध्ये टपाल विभागासह शासकीय निमशासकीय कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले.               नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉइज, नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉइस नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाकसेवक या सर्व संघटना संपामध्ये सहभागी झाले होते. शहरातील सर्व टपाल कर्मचारी मोठ्या संख्येने चिंचवड पूर्व टपाल कार्यालयासमोर एकत्रित येऊन आपल्या मागण्यांच्या संदर्भात कर्मचाऱ्यांनी विचार विनिमय केला. तसेच सरकारच्या कामगार विरोधी धोरणासबंधी घोषणाबाजी केली. यावेळी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. के.एस.पारखी (प्रादेशिक सचिव,पी-३), डी. आर.देवकर (प्रादेशिक सचिव,पी-४), आर.पी.कर्पे (प्रादेशिक सचिव,NUGDS), रमेश कांबळे (पोस्टमास्तर), विनायक सांगडे, भरत बागडे आदिंनी मार्गदर्शन केले. अक्षय पांडुरंग मिंढे (अध्यक्ष, NUGDS) यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला.

        या संपामध्ये प्रामुख्याने काही मागण्या मांडण्यात आल्या होत्या. यामध्ये…

  • टपाल खात्यामध्ये ५०% पेक्षा जास्त जागा ह्या रिक्त आहेत, त्या त्वरित भरण्यात याव्या.
  • नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करण्यात यावी.
  • ग्रामीण डाक सेवकांची भरती स्थानिक पातळीवर करण्यात यावी. 
  • टपाल खात्याचे खाजगीकरण त्वरित थांबवण्यात यावे.
  • कौन्टजेसी पेड वर्कर,कॅज्युअल लेबर,जी डी एस सह सर्वाना खात्यात समावून घेण्यात यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here