Chaupher News

दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्या लष्कारातील सहा जवानांना शौर्य चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ही घोषणा करण्यात आली. लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा, मेजर कोंजेंगबम बिजेंद्र सिंह, नायब सुभेदार नरेंद्र सिंह, नायब सुभेदार सोमबीर, नाईक नरेश कुमार, शिपाई करमदेव ऑरिअन यांना शौर्य चक्र जाहीर झाले आहे.

देशाच्या सुरक्षा करताना असामान्य कामगिरी बजावणाऱ्या लष्कारातील जवानांना शौर्य चक्र पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. २०१९मध्ये कर्तव्यावर असताना दहशतवाद्यांशी मुकाबला करत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सहा जवानांना शौर्य चक्र जाहीर झाले आहे. लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा, मेजर कोंजेंगबम बिजेंद्र सिंह, नायब सुभेदार नरेंद्र सिंह, नायब सुभेदार सोमबीर, नाईक नरेश कुमार, शिपाई करमदेव ऑरिअन यांचा गौरव करण्यात येणार आहे. लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा यांनी मणिपूरमध्ये दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी एक माहिती नेटवर्क तयार केलं. याच बळावर त्यांच्या नेतृत्वाखाली तुकडीनं १४ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here