Chaupher News

तुर्कस्तान : तुर्कस्तानच्या पूर्व भागात झालेल्या 6.8 रिश्‍टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असून आतापर्यत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. 500 जण जखमी झाले आहेत तर 30 जण इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली अडकल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

भूकंपग्रस्त भागात नजिकच्या राज्यातील बचाव पथके पाठवण्यात आली आहेत. या भागात अंधरात फ्लडलाईटच्या प्रकाशात गोठवणाऱ्या थंडीत मदत कार्य सुरू आहेत. लष्करलाही मदत कार्यासाठी पाचारण करण्यात आले आहे, असे संरक्षण मंत्री हुलुसी अकार यांनी सांगितले.

शेकडो नागरिक या घटनेने बेघर झाले. गेझीन जिल्ह्यात ढिगाऱ्या खालून एका जखमी व्यक्तीस बाहर काढतानाचे दृष्य टीव्हीवर दाखवण्यात येत होते. इलिझीगमध्ये 13 जण मरण पावले आहेत. तर मलात्या येथे पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here