Chaupher News
कर्जत : कर्जतच्या उपकारागृहातून पाच आरोपींनी पळ काढल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या आराेपींनी जुन्या पोलिस ठाण्याच्या इमारतीमध्ये असलेल्या कारागृहाच्या छताची कौले उचकटून पलायन केले.
ज्ञानदेव कोल्हे (नानज जवळा, ता. जामखेड), अक्षय राऊत (पारेवाडी, अरणगाव), मोहन भोरे (कवडगाव, ता. जामखेड), चंद्रकांत राऊत (पारेवाडी, ता. जामखेड), गंगाधर जगताप (महाळगी, ता. कर्जत) अशी पळालेल्या आरोपींची नावे आहेत. ते एकाच काेठडीत होते. कोल्हेवर रिव्हॉल्व्हरची बेकायदेशीर विक्रीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. अक्षय राऊत, मोहन भोरे व चंद्रकांत राऊत हे खुनाच्या गुन्ह्यात, तर गंगाधर जगताप बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत होता. फरार आरोपींच्या तपासासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.