चौफेर न्यूज – केंद्रीय लोकसेवा आयोगा (UPSC) प्रमाणे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगानंही (MPSC) परीक्षार्थींच्या प्रयत्न किंवा संधीच्या संख्येला मर्यादा घालून दिली आहे.

नव्या बदलानुसार, त्याप्रमाणे आता प्रत्येक खुल्या गटातील प्रत्येक उमेदवाराला सहा संधी मिळतील अनुसुचित जाती आणि जमाती प्रवर्गातील उमेदवारांस कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही तर उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांस कमाल नऊ संधी उपलब्ध राहतील.

तसंच, उमेदवाराने पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल.

एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही त्याची परीक्षेस उपस्थिती संधी गणली जाईल.

परीक्षेच्या कमाल संधीबाबतचा आयोगाचा प्रस्तुत निर्णय सन 2021 मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीस अनुसरून आयोजित परीक्षांपासून लागू होण्यात येईल.

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे IAS, IPS या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षांसाठी सुद्धा संधीची संख्याही अशीच आहे. MPSC परीक्षांसाठी खुल्या वर्गासाठी सध्या वयोमर्यादा 38 वर्षे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here