चौफेर न्यूज – JEE Main 2021 Exam Answer Key: अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा समजली जाणाऱ्या जेईई मेन बी.टेक. परीक्षेची उत्तरतालिका (JEE Main February Session Exam Answer Key) जाहीर झाली आहे. जेईई मेन (JEE Main 2021) फेब्रुवारी 2021 सत्रामध्ये B.Arch आणि B.Planing ची परीक्षा 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान झाली आहे. देशभरातील 331 शहरांमध्ये ही परीक्षा पार पडली. (National Testing Agency has released the answer key for JEE Main 2021 on its official website)

नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (National Testing Agency) जेईई मेन परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ते jeemain.nta.nic.in या वेबसाईटला बेट देऊ शकतात. 7 मार्च 2021 ला या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत परीक्षेचे आयोजन केले गेले. एनटीएनं या परीक्षेसाठी 852 परीक्षा केंद्रांची निवड केली आहे. सप्टेंबर 2020 मध्ये 660 परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाली होती. सध्या सुरु असलेल्या परीक्षेत देशभरातील 6 लाख 61 हजार 761 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.

नव्या शिक्षण धोरणानुसार जेईई मेन बी.टेक.परीक्षा 2021 इंग्रजी आणि हिंदी भाषेसह तेलुगू, तामिळ, पंजाबी, उर्दू, ओडिशा, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली, आमामी आणि गुजराती भाषेमध्ये घेतली गेली आहे. विद्यार्थ्यांना प्रथमच त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देण्याची संधी मिळाली होती. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट अशा पद्धतीनं घेतली गेली.

NTA च्या माहितीनुसार, परीक्षा केंद्रांना 2 शिफ्टमध्ये पूर्णपणे स्वच्छ केलं गेलं आहे. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांसाठी मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. परीक्षा सुरु असताना केंद्रावर फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन केले गेले. ही परीक्षा 2 शिफ्टमध्ये ही परीक्षा पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here