चौफेर न्यूज – आरोग्य विभागाची नुकतीच झालेली परीक्षा रद्द करावी, १६ हजार पदे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरावी या मागणीसाठी परीक्षार्थी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. न्यायालयीन खर्चासाठी परीक्षार्थी पुढे येत असून, त्यांनी न्यायालयीन खर्चासाठी पाऊण लाख रुपये उभारले आहेत.
आरोग्य विभागाने विविध पदांसाठी २८ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याने ही परीक्षा रद्द करण्याची मागणी परिक्षार्थींकडून करण्यात येत आहे. मात्र आरोग्य विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोळा हजार पदे भरण्याची घोषणा केली आहेत. त्यातील १२ हजार पदे खासगी कंपन्यांच्या मार्फत भरण्यात येणार आहे. खासगी कंपन्यांमार्फत परीक्षा घेण्यास परिक्षार्थींचा तीव्र विरोध आहे. खासगी कंपन्यांचा कारभार पारदर्शक नाही. त्या परीक्षेत घोटाळे झाल्याचे उघड झाले आहे. फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या भरतीत असेच घोटाळे झाले होते. त्याचे पुरावे गोळा केले आहेत. न्यायालयात हे सर्व मुद्दे मांडले जातील. अ आणि ब श्रेणीप्रमाणेच क आणि ड श्रेणीच्या परीक्षा एमपीएससी मार्फत घेण्याची मागणी करण्यात येणार आहे.