चौफेर न्यूज – विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मे महिन्यातील सर्व ऑफलाईन परीक्षा रद्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन परीक्षाही स्थानिक कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन तसेच कोरोनासंदर्भातील गाईडलाईन्सचे काटेकोर पालन करूनच घेण्यात याव्यात, अशा सूचनाही दिल्या आहेत. त्यासंदर्भात ‘यूजीसी’ने सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना पत्र पाठवले आहे.
देशात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने संसर्ग टाळण्यासाठी सर्व उच्च शिक्षण संस्थांना मे महिन्यात ऑफलाईन परीक्षा घेऊ नका तसेच कॅम्पसमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना दिल्या आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षांबाबत पुढील निर्णय घेतला जाईल असे ‘यूजीसी’ने स्पष्ट केले आहे.