चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये आज दि.15 जून 2021 वार मंगळवार रोजी ऑनलाइन माध्यमाने विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्राचार्या सौ. भारती पंजाबी मॅम, प्राचार्या सौ. वैशाली लाडे मॅम व व्यवस्थापक श्री. वैभव सोनवणे सर व श्री. तुषार देवरे सर यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व जागतिक मल्लखांब दिनानिमित्त मल्लखांबाचे पूजन करून करण्यात आली. याप्रसंगी इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी अवनी पवार हिने स्वागत गीत सादर केले. यासाठी नितु पंजाबी मॅम व श्वेता सोनवणे मॅम यांनी मार्गदर्शन केले.हेतवी वाघ, निखिल काकुस्ते, मृणाल बेडसे या विद्यार्थ्यांनी शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. यासाठी कुणाल देवरे सरांनी मार्गदर्शन केले. तसेच शाळेतील शिक्षिका सौ. सपना देवरे मॅम यांनी प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांचे स्वागत केले व ऑनलाइन शिक्षणाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. जागतिक मल्लखांब दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी शिवाजी सोनवणे, गुंजन पाटील, उत्कर्षा अहिरे, अश्विनी पाटील यांनी सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, पद्मासन इत्यादी आसनांचे प्रात्यक्षिके सादर केले व *स्वस्थ रहा, सुरक्षित रहा*असा संदेश दिला. यासाठी नितीन राजपूत सर यांनी मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या प्राचार्या सौ. भारती पंजाबी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना गतवर्षी ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. व यावर्षीदेखील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व बौद्धिक क्षमता वाढावी यासाठी वेगवेगळे उपक्रम व कौशल्याच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन दिले व विद्यार्थ्यांनी सतत शिक्षण प्रवाहात रहावे व उत्तम उपस्थिती दर्शवून प्रतिसाद द्यावा असा आग्रह केला. या कार्यक्रमाचे संयोजन सौ. सुनिता पाटील मॅम व सौ.स्नेहा पाटील मॅम यांनी केले. सूत्रसंचालन सौ.स्मिता नेरकर मॅम यांनी केले. फलक लेखन व सुंदर रांगोळी रेखाटन सौ. वृषाली सोनावणे मॅम, वैष्णवी थोरात मॅम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.