चौफेर न्यूज – आज दि. 21/10/2022 शुक्रवार रोजी प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे दिवाळी सण उत्साहात साजरा केला. शाळेच्या नवीन वास्तू मध्ये दिवाळी सणाचा आनंद घेण्यात आला.
दारी दिव्यांची आरस,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण
दिवाळी म्हणजे आनंदाचा क्षण. दिवाळी हा नात्यांचा सण तसेच वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, आणि भाऊबीज असा या पाच दिवसांची मांडणी सुबकपणे करण्यात आली.
आजचा या कार्यक्रमासाठी शाळेचे सम्नवयक श्रीमान राहुल पाटील सर व प्राचार्या श्रीमती अनिता पाटील मॅम उपस्थित होते. आजचा कार्यक्रमासाठी सुबक अशी रांगोळी काढण्यात आली व फलक लेखन करण्यात आला.
आजचे कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती अर्चना मॅडम यांनी केले. दिवाळीचे पाय दिवसाची माहिती शिक्षकांनी दिली.
दिवाळीच्या सणाला विद्यार्थ्यांनी उत्साहात भाग घेतला व रंगबेरंगी कपडे परिधान करून व एकमेकांना दिवाळीचा आनंद घेतला. शाळेतील विद्या्र्थ्यांनींने सुंदर असा डान्स केला व सगळ्यांचे मनोरंजन केले व बहिण भावाचे प्रेम गाण्यातून दर्शविले गेले.
दिवाळी सणाचे सर्वात मोठे औचित्य म्हणजे गेल्य पाच वर्षापासून माननीय चेअरमन साहेब प्रशांत भिमराव पाटील साहेब यांनी आयोजीत केलेला सर्वात स्तुत्य उपक्रम गरीब व गरजू लोकांना फराळ व कपडे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद व्दिगुणीत करण्याचा प्रयत्न दरवर्षी केला जातो. तसेच या मध्ये सर्व पालक व विद्यार्थी यांचा सिंहाचा वाटा असतो. आजचा या दिवाळी सणानिमित्त फराळ व कपडे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सहकार्याने कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.